महाराष्ट्र

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे  निवडणूक आयोगाचा निर्णय…

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे  निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली होती. जर निवडणुक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाच्या चिन्ह काय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती. 

या बैठकीमध्ये शरद पवारांनी चिन्हाची यादी देखील केली होती. त्यामुळे आता शरद पवार लवकरच त्यांच्या पक्षाचं नव नाव आणि चिन्ह जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे. जो न्याय निवडणूक आयोगाने शिवसेना दिला होता, तोच आता राष्ट्रवादीला दिला आहे. त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शरद पवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Img 20240202 wa00034606059587729487622
Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये