पुणे शहर

पुणे मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण : मेट्रो धावली मुठा नदीखालून…

पुणे : पुणे मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर चाचणी पूर्ण केली.आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु केली.

बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो ट्रेन ११ वाजून ५९ मिनिटांनी स्वारगेट भूमिगत स्थानक येथे पोहचली (सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक अंतर ८५३ मी, बुधवार पेठ स्थानक ते मंडई स्थानक अंतर १ किमी आणि मंडई स्थानक ते स्वारगेट स्थानक अंतर १.४८ किमी). या चाचणीसाठी १ तास वेळ लागला. या चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी ७.५ किमी इतका ठेवण्यात आला होता. ही चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार पार पडली. एकूण ३.३४ किमी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.  

Img 20240202 wa00034606059587729487622

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, पुणे मेट्रो प्रकल्पाचे संचालक श्री. अतुल गाडगीळ (कार्य), श्री. विनोदकुमार अग्रवाल (संचलन व प्रणाली), कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (जनसंपर्क व प्रशासन), श्री. राजेश द्विवेदी (संचलन, सुरक्षा व देखभाल) तसेच पुणे मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये