पोलीस भरती रद्द , महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुण्यात जोरदार आंदोलन

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले आंदोलन
पुणे : राज्यातील पोलीस भरती रद्द केल्याच्या तसेच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला नेले जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील लाल बहादूर शास्त्री रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. राज्यात युवकांचे भवितव्य अधिक गडद होत असल्या बाबत पालकांच्या पोटाला पीळ पडला आहे अनेक मोठमोठे उद्योग बाहेर पाठवले गेले , पोलीस भारतीचा बनाव करून युवक निराश झाला आहे.महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे याची खंत वाटते महाराष्टाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरत असल्याच्या भावना यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराअध्यक्ष किशोर कांबळे कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, महेश हांडे , श्रीहरी दबडे, गिरीष गुरुनानी, आनंद सागरे, गजानन लोंढे, कुलदीप शर्मा, योगेश सुतार, विनायक गायकवाड, रुपेश संत, स्वप्निल जोशी, अमोल ननावरे, स्वप्निल थोरवे, जावेद इनामदार, किरण गाडेकर, गोविंद जाधव व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रात अनेक लोकांहिताचे प्रश्न आ वासून उभे आहेत. युवक बेरोजगारीने हंबरडा फोडत आहेत. आजपर्यंत आपला पोशिंदा राजा बळीराजा पूर्ण पणे कोलमडला आहे. लाखो आत्महत्या पहायला मिळत आहेत. आता वेळ आली आहे या महाराष्ट्रातला युवक वर्ग बेरोजगारीने पिचला जात असून त्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण सरकार कडे नाही. हे चित्र बदलण्यात शिंदे सरकार कडे ठोस कुठलेही धोरण नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी निषेध करताना राष्ट्रवादी युवक च्या वतीने “शिंदे फडणवीस जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.









