महाराष्ट्र

पोलीस कर्मचाऱ्याला आमदार संजय बांगर यांची शिवीगाळ; बांगरांनी आरोप फेटाळले

मुंबई : शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संजय बांगर पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. संजय बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रालयात जाताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने थांबवत पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मला ओळखत नाही का? अशी विचारणा संजय बांगर यांनी केल्याचं सांगण्यात येत आहे.

Fb img 1647413711531 1

संजय बांगर आपल्या १५ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना गेटवर २७ ऑक्टोबरला कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. पोलीस कॉन्स्टेबलने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. संजय बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

Img 20221012 192956 045 1

“मी कोणत्याही प्रकारे पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली नाही. मी काही कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्याने डायरीत प्रवेशाची नोंद करण्यास सांगितलं. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचं सांगितलं. त्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं नव्हतं. पण ओळखल्यानंतर सन्मानाने मला आत पाठवलं. माझ्या पीएने नंतर डायरीत नोंद केली. आम्ही कोणतीही हुज्जत घातली नाही,” असा दावा संजय बांगर यांनी केला आहे. “हुज्जत घातली असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा,” असंही ते म्हणाले.

“मी कशासाठी पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालेन. तो बिचारा कर्मचारी सकाळपासून तिथे काम करत असतो. कर्तव्य बजावणाऱ्या त्या कर्मचाऱ्याशी मी हुज्जत घातली नाही,” असा बांगर यांचा दावा आहे.

संजय बांगर याआधीही वादामुळे चर्चेत आले आहेत. शिंदे गटात सहभागी झाल्यापासून ते तिसऱ्यांदा वादात अडकले आहेत. याआधी माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत डबे पुरवणार्या गोडाऊन व्यवस्थापकाला त्यांनी मारहाण केली होती. हा वाद चांगलाच पेटला होता. तसंच एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ आमि मारहाण केल्यानेही वादात अडकले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये