आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तर हल्लेखोरास पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

Fb img 1647413711531 1

इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफकडून (पीटीआय) पाकिस्तानमध्ये तातडीने निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत आहे. याच मागणीला घेऊन लाहोर ते इस्लामाबादपर्यंत ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा ४ नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद येथे पोहोचणार होता. मात्र त्याआधीच वझिराबाद येथील जफर अली खान चौक येथे हा मोर्चा आल्यानंतर त्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.

“पाकिस्तामध्ये इम्रान खान यांच्यावर हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आम्ही या घटनेवर नजर ठेवून आहेत. आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींवरही आमचे लक्ष असेल,” असे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले आहेत.

Img 20221012 192956 045 1

रॅलीमध्ये झालेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. या घटनेनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्लाहच्या कृपेने मी बचावलो. अल्लाहमुळे मला दुसरे जीवन मिळाले, असे इम्रान खान म्हणाले आहेत. तर पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी तपास यंत्रणेला घटनेबद्दलचा अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये