पुणे शहर

निसर्ग कवी ना. धो. महानोर यांच्या गीतांनी व कवितांनी रम्य ठरली कर्वेनगरवासीयांची दिवाळी पहाट!

कर्वेनगर : निसर्ग कवी ना. धो. महानोर यांची मनाला भावून जाणारी, आपलीशी वाटणारी मराठी गीते, पहाटेच्या सुमारास कानावर पडली आणि कर्वेनगरवासीयांची दिवाळी पहाट आज रम्य झाली. निमित्त होते ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घन ओथंबून येती.. या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

दीपावली म्हणजे आपणा साऱ्यांसाठी उत्साह आणि आनंद द्विगुणित करणारा सण! याच दीपावलीच्या औचित्याने स्वप्नील दुधाने यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

या वर्षी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल या ठिकाणी निसर्गकवी स्व. ना. धो. महानोर यांना आदरांजली देण्यासाठी त्यांच्या सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गायक आणि वादक यांनी आपल्या कलेचा आविष्कार करत उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

यावेळी आपल्या कोथरूड परिसरातील रहिवासी असणारे रोहन कडू ज्यांना बार्सिलोना, स्पेन या ठिकाणी ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत सर्वोच्च कामगिरीचे दर्शन घडवत ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला आहे, तसेच जिनिअस चाईल्ड विथ एक्सस्पेशनल ग्रास्पिंग एबॅलिटीज आणि रायझिंग स्टार ऑफ द इयर २०२३ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या अवघ्या दोन वर्षीय वृत्तिका बासुतकर हिचे नाव कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आपल्या देशाचे आणि पर्यायाने पुण्यनगरीचे नाव जगाच्या नकाशावर कोरणाऱ्या या दोघांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले.

हा सन्मान सोहळा आणि सुमधुर गीतांमुळे रसिक श्रोत्यांना कलाकारांनी जागीच खिळवून ठेवले. स्व. महानोर आणि त्यांच्या साहित्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या अनेक रसिकांनी यावेळी उपस्थित राहत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सादर झालेल्या गीतांनी व कवितांनी उपस्थितांची मने प्रसन्न केली.

Img 20230511 wa0002282296555721650380460122
Fb img 16997545332478063009632470005805
Img 20231112 wa00232265529059577421901
Img 20231112 wa00314068627009214606118
Img 20231112 wa00084245679956121736894
Img 20231112 wa00131228884357653556833
Fb img 16997796665812736881535248315558
Fb img 16997856846731842935112977471072
Img 20231112 wa0029506383627803066877
Img 20231112 wa00051596336861619965457
Img 20231112 wa00348639945291975793133
Img 20231112 wa00068214416706074968579
Img 20231112 wa00222708193954240525371
Img 20231112 wa0091613963473782521233
Img 20231112 wa00072576930588635310622
Digital 20231112 123519 00006696680381270481811
Img 20231112 wa00175045938042750537567
Fb img 16997796205907478989327917216608
Img 20231112 wa00193038845121130085932
Img 20231112 wa00166298405371436066105
Fb img 16997852760745870902953909333301
Img 20231111 wa00138990855750371916874
Img 20231112 wa00356868697546848260642

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये