महाराष्ट्र

लक्ष्मीपूजन’; वाचा लक्ष्मीपूजनाची प्रथा, परंपरा आणि शुभ मुहुर्त

दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील महत्वाची पूजा मानली जाते. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते. यावर्षी लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर म्हणजेच आज केलं जाणार आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. याच संदर्भात अधिक माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

Img 20231111 wa0004281293263544100257595665

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितल्याप्रमाणे, लक्ष्मीपूजन हे आज 12 नोव्हेंबरलाच नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यावेळी घरोघरी लक्ष्मीचं देखील पूजन केलं जातं.

Img 20230803 wa0004281298499086669704171738

घरातील पैसे, सोने-नाणे हे देवीच्या फोटोसमोर मांडून त्याची पूजा केली जाते. या लक्ष्मीने आपल्या घरी स्थिर राहावं, आपल्याला सुख द्यावं, ऐश्वर्य द्यावं यासाठी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन केले जाते. या दिवशी अंगाला उटणे लावून आंघोळ करतात. या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा करून, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते.

Fb img 16997545332478063009632470005805

रविवारी 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी ते रात्री वाजून 36 मिनिटांपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करू शकता.

Img 20231112 wa00314068627009214606118

अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.

Img 20231112 wa00084245679956121736894

महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.

Img 20231112 wa00232265529059577421901
Img 20231112 wa0029506383627803066877
Img 20231112 wa0018281295171501436526047055
Img 20231112 wa00051596336861619965457
Img 20231111 wa0004281292791598778819580777
Img 20231112 wa00131228884357653556833
Img 20231112 wa00348639945291975793133
Img 20231112 wa00356868697546848260642
Img 20231112 wa00072576930588635310622
Img 20231112 wa00166298405371436066105
Img 20231111 wa00138990855750371916874
Img 20231112 wa00175045938042750537567
Img 20231112 wa00193038845121130085932
Img 20231112 wa00222708193954240525371
Img 20231112 wa00068214416706074968579

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये