पुणे शहर

सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना!

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना एका कार्यक्रमात घडली. सुदैवाने या दुर्घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. साडीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी बाजूला होत ही आग विझवली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन समारंभात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी दीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. मात्र ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुप्रिया सुळे यांनी बाजूला होत लगेच साडीला लागलेली आग विझवली.

या दुर्घटनेनंत मला कसलीही इजा झाली नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. “आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे; की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये.आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. सर्वांचे मनापासून आभार,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये