पुणे शहर

अजित पवार, आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकीसाठी युती होणार का?

पुणे : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसांत ते पुणे येथे येऊन आढावा घेतील. सध्यातरी शिवसेनेनं स्वबळाची तयारी सुरु केली आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. तशी माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

पुणे महापालिकेवरील सत्ता महत्त्वाची असल्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेनेदेखील ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. शिवसेनेनं स्वबळाची तयारी सुरु केली आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. तशी माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे. 

दुसरीकडे पुणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवार किंवा शनिवारी पुण्यात पक्षाची बैठक घेण्याची शक्यता आहे. बैठकीत अजित पवार स्वबळाचा नारा देणार की पुण्यात युती होणार ? याबाबत उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये