महाराष्ट्र
माणुसकी आली धावून.. बचाव कार्याला वेग एनडीआरएफ टीम सोबत स्थानिक लोक सहभागी Photo

या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की लोकं या पायवाटेने सुद्धा मार्ग काढत मदतीसाठी पोहचतायत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही पथकं, जवान आणि नागरिक एकजुटीने कार्यरत आहेत.

गावात जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. त्यामुळे तिथे यंत्रणा पोहोचण्यास अडचणी येत आहेत. जेसीबी. पोकलेन यासारखी वाहणं तिथं पोहचू शकत नाहीयेत. त्यामुळे कुदळ, फावड्याच्या सहाय्याने NDRF कडून बचावकार्य केलं जात आहे. स्थानिकही या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.



चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

















