राष्ट्रीय

मणिपूर महिला अत्याचाराच्या घटनेने देशभरात संताप

नवी दिल्ली : मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे मानले जात असतानाच एका समाजातील दोन महिलांना नग्न करून काही पुरुष रस्त्यावर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यातील ही घटना आहे. हा व्हिडिओ 4 मे 2023 चा असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने देशभरात महिला नक्की सुरक्षित आहेत ना? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमकडून या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पुरुष पीडित महिलांचा सतत विनयभंग करताना दिसत आहेत. या प्रकारातील दोषींवर शिक्षा झाली पाहिजे ,अशी मागणी विविध संघटना व राजकीय पक्षांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित आदिवासी आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी या प्रकरणी कडक पावलं उचलली जातील अशी ग्वाही दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्वतः हून मणिपूर हिंसाचाराची दखल घेत मणिपूर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. दरम्यान यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या घटनेने 140 कोटी भारतीयांना लाजवले आहे. कायदा पूर्ण ताकदीने काम करेल आणि दोषींना सोडले जाणार नाही. ईशान्य राज्यातील वांशिक हिंसाचारावर न बोलल्याबद्दल विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेच्या दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “माझे हृदय वेदना आणि रागाने भरले आहे.” राहुल गांधी, आदित्य ठाकरे, प्रियंका गांधी, अभिनेता अक्षय कुमार यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30
Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये