कोथरुड

भाजपकडून ८०० रिक्षा चालकांना सुरक्षा किट प्रदान ; नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांचा उपक्रम

कोथरूड : बावधन-कोथरूड डेपो या प्रभाग क्र.१० मधील ८०० रिक्षा चालकांना कोरोंनापासून सुरक्षित राहण्याकरिता रिक्षाचालक व प्रवासी यांच्यामधील सुरक्षा पडदा आणि मास्कचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी  कोरोनाच्या संकटकाळात  सेवारुपी कार्य करत असणाऱ्या प्रभागातील सर्व नवनिर्वाचित महिला मोर्चा रणरागिनींना कोरोना योद्धा म्हणून पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नगरसेवक किरण दगडे-पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे-पाठक, कोथरूड भाजपा अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, राहुल देशपांडे, गणेश वरपे, मंदार घुले, विठ्ठल बराटे, समीर पाटील तसेच प्रभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैभव मुरकुटे व आभार प्रदर्शन शैलेश वेडेपाटील यांनी केले

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये