नागरिकांना दिलेला शब्द पाळायचा हे किरण दगडे पाटील यांचे वैशिष्ट्ये : रावसाहेब दानवे पाटील

चंद्रकांत पाटील व रावसाहेब दानवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ हजार नागरिकांना दिवाळी सरंजाम वाटप
कोथरुड : केवळ निवडणूक आली की कार्यक्रम न घेता गेली आठ वर्ष सतत एक सामाजिक उपक्रम म्हणून किरण दगडे पाटील हे दिवाळी सरंजाम वाटपाचा कार्यक्रम आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी घेत आहेत. नागरिकांना दिलेले वचन पाळायचे हे किरण दगडे पाटील यांचे वैशिष्ठ्ये आहे. सलग आठ वर्ष चालू असलेल्या कार्यक्रमातून नागरिकांनी प्रति त्यांची असलेली तळमळ दिसत असल्याचे मत केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केले.
माजी नगरसेवक किरण दगडे पाटील व माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रभाग १० भुसारी कॉलनी, बावधन मधील ६ हजाराहून अधिक नागरिकांना दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमात रावसाहेब दानवे पाटील बोलत होते. त्यांच्या व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सरंजाम किटचे वाटप यावेळी करण्यात आले. या प्रसंगी आमदार भिमराव तापकीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, अल्पना वरपे, श्रध्दा प्रभुणे, आदी उपस्थित होते.
रावसाहेब दानवे पाटील म्हणाले, राजकीय नेते घोषणा करतात पण एक दोन वर्षाने विसरून जातात. पुन्हा निवडणूक आली की त्यांना त्याची आठवण येते, पण किरण दगडे पाटील यांची पद्धत वेगळी आहे. केलेली घोषणा नागरिकांसाठी कोणताही खंड न पडता पाळायची आणि सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवायचे ही त्यांची खासियत आहे. नवीन सरकारने सर्वांना बंधन मुक्त केले असून दिवाळीचा सण उत्साहात साजरा करा व कोरोना सारखे महासंकट पुन्हा येऊ देऊ नकोस अशी प्रार्थना दिवाळीत परमेश्वराकडे करा असे आवाहन पाटील यांनी केले.
सातत्याने आठ वर्ष दिवाळी सरंजाम वाटप उपक्रम राबवणे कौतुकास्पद : चंद्रकांत पाटील
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांचा प्रत्येक कार्यक्रम भव्य असतो. सातत्याने नागरिकांसाठी चांगले उपक्रम घेण्याची त्यांची धडपड सुरू असते. गेली आठ वर्ष सतत दिवाळी सरंजाम वाटप उपक्रम घेणे हे खरंच कौतुकास्पद आहे. महापालिकेच्या माध्यमातून विकास कामे करत असतानाच नागरिकांची गरज ओळखून ते विविध उपक्रम राबवत असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सेवा कार्याचे ते तंतोतंत पालन करत आहेत याचा अभिमान वाटतो.



दिवाळी सरंजाम उपक्रम गेली आठ वर्ष सातत्याने राबवत असताना नागरिकांना दिलेला शब्द पाळत असल्याने मनाला एक समाधान मिळत आहे. प्रभागातील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी हाच या मागचा हेतू असून त्यामुळेच कोणताही खंड न पाडता हा उपक्रम राबवत आल्याचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले










