पुणे शहर

वीर फकिरा पुरस्कार विजय डाकले यांना प्रदान..

पुणे : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त पुणे शहर व जिल्हा मातंग समाजाच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्याकरीता देण्यात येणारा आदर्श कार्यकर्ता म्हणुन ‘वीर फकिरा’ पुरस्कार  विजय डाकले यांना श्रीमंत छत्रपती संभाजी राजे भोसले  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विर फकिरा पुरस्कार देऊन डाकले यांना सन्मानित करण्यात आले.  यावेळी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव विकास सातारकर, स्वागताध्यक्ष शंकर शेंडगे, सदाभाऊ ढावरे, श्री. भगवानराव वैराट, साहित्यिक संपतराव जाधव, लक्ष्मण तांदळे, अजित ईंगळे, वैजनाथ वाघमारे, रामभाऊ कसबे, परमेश्वर लोंढे, शाम ढावरे, शंकर तेलंगे, अशोक जाधव, कैलास कदम यांच्यासह हजारो समाजबांधव हजर होते.

विजय डाकले हे गेली ३० वर्षापेक्षा जास्त काळ सामाजिक क्षेत्रात काम करत असुन दलित, पिडीत, वंचित समाजाकरिता सातत्याने लढणारा कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख आहे. आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारकाच्या अध्यक्षपदीची जबाबदारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डाकले यांच्यावर सोपवल्या पासुन त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले . तत्कालीन ऊपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी विजय डाकले आणि समिती सदस्यांनी केलेली मागणी मान्य करुन १०० कोटींच्या भरघोस निधीची तरतुद स्मारकासाठी केली. यांतील अडचणी दुर करुन स्मारकासाठीची आरक्षित जागेचा अधिकृत ताबा घेतला, स्मारकाचा भव्यदिव्य आराखडा बनवुन घेतला.

महिला समृध्दी योजनेच्या माध्यमातुन २७०० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी ५०,००० रुपयांचे अनुदान मिळवून देणे असो किंवा वाल्मिकी आंबेडकर योजनेच्या माध्यमातुन राबवलेली मोफत घर योजना असेल त्याच बरोबर आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक उभारणीसाठी केलेला पाठपुरावा व त्याला आलेले यश असेल या सर्व कामांची समाजाने दखल घेतली असेच त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणावे लागेल.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये