पुणे शहर

शास्त्रीनगर चौकात ट्रॅव्हल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे : ट्रॅव्हल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येरवडा येथील शास्त्रीनगरमधील महादेवभाई देसाई चौकात घडली आहे. राजेंद्र जगन्नाथ देसाई (वय 57 रा. स्वारगेट, पुणे) यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून गुंजन चौकाकडून नगर रोड कडे जाणारी ट्रॅव्हल बस क्रमांक (MH 14 HG 3969) हिने ऍक्टिवा क्र. (MH 15 DP 7809) या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील चालक बसच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे शास्त्रीनगर चौकात वाहतूक कोंडी झाली होती. येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मागील पंधरा दिवसात वेगवेगळ्या अपघातात येरवड्यात चार जणांचा मृत्यू झालेला आहे. येरवडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये