पुणे शहर

कात्रज बाह्यवळण मार्गावर भीषण अपघात ;एक जण ठार

पुणे: कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव येथील पेट्रोल पंपाजवळ सकाळी दहाच्या सुमारास ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात एक दुचाकी चालक ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दहाच्या सुमारास कात्रज कडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक ने समोरील समोरील पिकअप टेम्पो एवढ्या जोरात धडक दिली की टेम्पो बाजूच्या खोल चारित जाऊन कोसळला त्यानंतर तो ट्रक पुढील आठ नऊ वाहनांना धडकत गेला. या ट्रकची एका दुचाकीलाही धडक बसली त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पाच जण या अपघातात जखमी झाले आहेत. धडक देलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. क्रेन च्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यास सुरूवात झाली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये