पुणे शहर

“ती” च्या आरोग्यासाठी उपक्रमाचे कोथरूडमध्ये आयोजन

पुणे : कोथरुड परिसरातील वनाज परिवार विद्या मंदिर  शाळेमध्ये “ती” च्या आरोग्यासाठी या उपक्रमा अंतर्गत 500 मुलींना दरमहा विनामूल्य सॅनिटरी पॅड तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन या कार्यक्रमाची प्रातिनिधिक सुरुवात करण्यात आली. या वेळी आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.

या कीट मध्ये सॅनिटरी नॅपकीन, खजुर, रक्तवाढीचे टॉनिक, मसाले आणि ड्रेस मटेरियल देण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन पुणे शहर भाजपा महिला आघाडी सरचिटणीस कांचन रुपेश कुंबरे यांनी केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. डॉ. हेमांगी पाटसकर व पल्लवी शिवकुमारश्री यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका वासंती जाधव, कोथरुड महिला अध्यक्षा हर्षदा  फरांदे, कल्याणी  खर्डेकर,, अश्विनी भालेकर ,अमित तोरडमल, वैभव मुरकुटे , सागर कडू, बंडू कचरे प्रदीप जोरी, योगेश राजापूरकर, राजेश मांगिरे, रुपेश कुंबरे उपस्थित होते.

IMG 20210707 WA0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये