पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत प्रॉपर्टीकार्डवर नाव अद्ययावत करून देण्याच्या उपक्रमाचा कर्वेनगरमध्ये शुभारंभ

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, व अध्यक्षा, कायदे प्रकोष्ठ, भा ज पा (महिला आघाडी), पुणे शहर व स्विकृत नगरसेविका वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा अँड् मीताली कुलदीप सावळेकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून प्रॉपर्टीकार्डवरील नाव अद्ययावत करणे व त्यातील शंका व त्रूटी दूर करण्यासाठी तज्ञ वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे.

ही टीम सुरूवातीला कोथरूडमधील प्रत्येक सोसायटी, अपार्टमेंट तसेच वैयक्तित नागरीकांनाही प्रॉपर्टीकार्ड संदर्भातील मार्गदर्शन विनामूल्य करणार आहे व प्रॉपर्टीकार्ड शिवाय इतर कायदेशीर मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास तेही सशुल्क उपलब्ध असेल. या उपक्रमाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रभाग १३ मधील निवडक सोसायट्यांना उपक्रमासंदर्भातील पत्र देऊन करण्यात आला.

IMG 20210707 WA0004

यावेळी पाटील यांनी सोसायटी पदाधिका-यांशी संवाद साधला तेंव्हा ते म्हणाले, “आपले घर” आपल्या जेवढे जिव्हाळ्याचे असते तितकेच त्या घरावरील सर्व कागदपत्रांवर आपले नाव अद्ययावत असणे गरजेचे असते त्याचाच एक भाग म्हणून आपले प्रॉपर्टीकार्डवरचे नाव अद्ययावत करून घेण्यात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी ही टीम आपल्याला मदत करणार आहे. भविष्यात प्रॉपर्टी कार्ड हे मालकी हक्काचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल त्या दृष्टीने या उपक्रमाचा नागरिकांना खूप उपयोग होणार आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

यावेळी अँड् सौ मीताली कुलदीप सावळेकर यांनी या उपक्रमाची प्रक्रिया विस्तृतपणे विशद करताना सांगितले,” की खरतर प्रॉपर्टीकार्ड बाबतीत कायदयानुसार आपण फक्त आवश्यक कागदपत्रांसोबत माहिती देणे एवढेच आवश्यक असते परंतु प्रत्यक्षात अनेकांना ही प्रक्रीया खूप किचकट, वेळखाऊ व जिकरीची वाटते. तसेच प्रॉपर्टीकार्ड व नावे अद्ययावत करत असतानाचा सर्व्हे नं ते सिटी सर्व्हे नं, संयुक्त प्रॉपर्टी कार्ड स्वतंत्र करणे, काही तांत्रीक चुका यामुळे अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे अडकेलली असतात ह्या दृष्टीने ह्या उपक्रमाद्वारे ही प्रक्रिया आपल्याला सुलभ व सोयीची वाटेल याची आम्ही काळजी घेऊ याची ग्वाहीही त्यांनी दिली”.

तसेच कोथरूडनंतर पुढील टप्प्यात हा उपक्रम संपूर्ण पुणे शहरात भा ज पा तर्फे राबविण्यात येणार असल्याचे या निमित्ताने सांगितले.सदर उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी दर बुधवारी १२ ते ४ यावेळेत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील कार्यालयात संपर्क करावा.असे अँड् प्राची बगाटे यांनी सांगितले.

यावेळी पुढील सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते

आनंद रेसिडन्सी : श्री दाते व श्री लांजेकर,स्थैर्य सोसायटी : जागृती कणेकर व वर्षा पाटील, सुगम सोसायटी : श्री शेजवलकर, चेतन देशपांडे, युनायटेड वेस्टर्न सोसायटी : संगिता शेवडे,पद्मरेखा सोसायटी : मंदार पानसे, शरद लेले,विनीत सोसायटी : सुधीर थोरात, मंदार वाकणकर, अजित मुथा,स्वप्नशिल्प सोसायटी : विवेक विप्रदास व प्रशांत भोलागीर, सक्सेस स्क्वेअर सोसायटी : श्रीपाद गोहाड, व्यंकटेश देव

यावेळी सर्व सोसायट्यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात संगिता शेवडे म्हणाल्या,” चंद्रकांत पाटील यांच्या दुरदृष्टीचा या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यय आला व लोकहितासाठी ते कायमचं आग्रही व सक्रिय असतात त्याच बरोबर या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अँड् सौ मीताली सावळेकर व त्यांच्या टीमचेही आभार मानले व या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा ही दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये