महाराष्ट्र

नितेश राणेंच्या अडचणीत वाढ ; अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी ..

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी नितेश राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते गैरहजर होते. त्यामुळे आता पोलिसांनी अटकेची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. रात्रीपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. त्यामुळे सध्या सिंधुदुर्गात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये