पुणे शहर
कोथरूड मधील पौड फाटा उड्डाणपुलाची एक लेन दुरुस्तीच्या कामासाठी “या” कालावधीत बंद राहणार…

पुणे : पौड फाटा येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी नळस्टॉप कडून कोथरूडकडे जाणारी उड्डाणपुलावरील वाहतुकीसाठी एक लेन काही दिवस बंद राहणार आहे. त्यामूळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा उपयोग करण्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.
पौड फाटा येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर उड्डाणपुलाच्या
दुरुस्तीसाठी नळस्टॉप कडून कोथरूडकडे जाणारी उड्डाणपुलावरील एक लेन दि. २७/१०/२०२५ ते दि. २६/११/२०२५ पर्यंत बंद राहणार असून उर्वरित एक लेन दुचाकी व हलक्या चारचाकी (LMV) वाहतुकीसाठी सुरू असणार आहे. नागरिकांनी कृपया जड वाहनांसाठी नळस्टॉप कडून कोथरूडकडे जाण्याकरिता उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.




