पुणे शहर

कोथरूडमध्ये पेट्रोल २४ रुपयांनी स्वस्त, वर्धापन दिनी कोथरूड युवक राष्ट्रवादी तर्फे यशस्वी मोहीम.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाचे अवचीत्य साधून युवक राष्ट्रवादीच्या गिरीश गुरूनानी यांनी कोथरूड मधील नागरिकांना अनोखी भेट दिली. देशात महागाई मुळे सामान्य जनता त्रस्त असताना आणि पेट्रोल च्या भावाने उचांक गाठलेला असताना कोथरूडकरांना रविवारी सकाळी एक अनोखी आणि आल्हाददायी भेट युवक राष्ट्रवादी तर्फे देण्यात आली.

गिरीश गुरूनानी यांनी राबवलेल्या या उपक्रमानुसार आज कोथरूड मधील लोढा पेट्रोल पंपावर येणाऱ्या नागरिकांना पेट्रोल चक्क बाजारभावापेक्षा २४ रुपयांनी स्वस्त देण्यात आले. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश काकडे यांची उपस्थित होती. अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पेट्रोल पंपावर सर्व प्रथम येणाऱ्या नागरिकाच्या हातूनच या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व त्याला स्वस्त पेट्रोल चा लाभ घेता आला. त्याचबरोबर ५६६  इतर लाभार्थी यांनी या  वर्धापन दिनानिमित्त असलेल्या भेटीचा अनोखा लाभ घेतला. 

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

या वेळी किशोर कांबळे, मिलिंद वालवडकर, अजिंक्य पालकर, निलेश शिंदे, संतोष डोख, शुभम माताळे व समीर उत्तरकर हे मान्यवर उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेचे अमोल गायकवाड, प्रीतम पायगुडे, संदेश कोतकर, ऋषिकेश डफळ, ऋषिकेश शिंदे, केदार कुलकर्णी, प्रथमेश नाईक,श्वेता मिस्त्री,ऋषिकेश कडू व इतर पदाधिकारी एवं कार्यकर्ते उपस्थित होते.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये