पुणे शहर

पुण्यातून शरद पवारांना धमकी देणाऱ्या एकाला अटक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून (Social Media) धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकानं अटक केली आहे. सागर बर्वे (वय 34) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Fb img 16837376233493064729888638918603

या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथकं तयार करण्यात आली होती. अखेर पवारांना धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं. दरम्यान, आरोपीची चौकशी सुरू आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली. आरोपी सागर बर्वे हा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच धमकी देणारी दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावानं एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. 

महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे.  मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार असतील, असं खासदार सुप्रिया सुळे यापूर्वी म्हणाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये