महाराष्ट्र
Petrol Price : पेट्रोल 5 आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

मुंबई : पेट्रोलच्या करात ५ तर डिझेलच्या करात ३ रुपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या कर कपातीमुळे सरकारी तिजोरीवर ६ हजार कोटींचा भार येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळी विकासकामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे आणि १८ ते ५० वयोगटातील लोकांना करोनाचा बुस्टर डोस मोफत मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.




