कोथरुडपुणे शहर

शिवजयंतीनिमित्त एआरएआय टेकडीवर वृक्षांचे रोपण

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने वृक्षारोपण करण्यात आले.’एआरएआय’ टेकडीवर वृक्ष लावण्याची मोहीम रावबविण्यात आली.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली- स्वराज्य! त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ देऊ या. शिवजयंतीला प्रत्येकाने झाडे लावू या, ती जगवू या! या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या ! याच उद्देशाने हा उपक्रम अपूर्व उत्साहाने राबविण्यात येत आहे. पुण्यातील टेकड्या या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यादृष्टीने वृक्षारोपणाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन देखील होणार आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले.

या प्रसंगी विद्यार्थी प्रभारी सनी मानकर ,युवक अध्यक्ष किशोर कांबळे , विद्यार्थी कार्याध्यक्ष शुभम माताळे ,नवनाथ भाऊ खिलारे,चंद्रकांत कुदळे,अमोल गायकवाड,संकेत शिंदे,सौरभ ससाणे,रवी गाडे आदी माननीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये