पुणे शहरराजकीय

करण मानकर सुतारदरा- भुसारी कॉलनी प्रभागातून तर दीपक मानकर आणि हर्षवर्धन मानकर केळेवाडी प्रभागातून इच्छुक

कोथरूडमधील राजकीय समीकरणे बदलणार

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीची तारीख लवकरच निश्चित होणार असल्याने निवडणूकीसाठी प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. आणि करण मानकर सुतारदरा- भुसारी कॉलनी या प्रभागामधून तर माजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर आणि हर्षवर्धन मानकर हे केळेवाडी – जयभवानीनगर प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा कोथरूडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये मोठया प्रमाणावर राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोथरूड भागामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी नगरसेवक दीपक मानकर यांच्या कडून जोरदार तयारी सुरू असून त्याबाबत बैठका आणि गाठी भेटी सुरू करण्यात आल्या आहेत. सुतारदरा- किष्किंधानगर- जयभवानीनगर – रामबाग कॉलनी – केळेवाडी हा भाग मानकर यांचा बालेकिल्ला आहे. नवीन प्रभाग रचनेत केळेवाडी- जयभवानीनगर हा प्रभाग क्रमांक -३०  आणि सुतारदरा- भुसारी कॉलनी हा प्रभाग क्रमांक-३२ असे दोन प्रभाग तयार झाले आहेत.

केळेवाडी – जयभवानीनगर प्रभाग क्रमांक -३० मधून नगरसेवक दीपक मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर हे निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. तर करण मानकर हे सुतारदरा- भुसारी कॉलनी -३२ या प्रभागातून निवडणूकीसाठी इच्छुक आहेत.

कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहानुसार करण मानकर यांनी सुतारदरा भागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हि निवडणूक रंगतदार होणार आहे. माजी सभागृहनेते शंकर केमसे देखील या प्रभागातून इच्छुक असून त्यामुळे ३० आणि ३२ या दोन्ही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रबळ पॅनल तयार झाले आहे.

त्यामुळे कोथरूड भागामध्ये विरोधकांसमोर या दोन प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तगडे आव्हान निर्माण झाले आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये