कोथरुड

कोथरूड मधील या भागात सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत ; तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी..

कोथरूड: कोथरूड मधील डावी- उजवी भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलेज परिसर, गादीया इस्टेट – शास्त्रीनगर तसेच सागर कॉलनी- डी पी रोड परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा  लागत आहे. सततच्या वीज पुरवठा खंडित प्रकारामुळे खेडे गावा पेक्षा वाईट परिस्थिती कोथरूड मधील वरील भागातील नागरिक अनुभवत आहेत. त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केली आहे.

सदर मागणीचे निवेदन माजी नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांनी मुख्यअभियंता महावितरण पुणे परिमंडल सुनील काकडे यांना आमदार भिमराव तापकीर यांच्या उपस्थितीत दिले. यावेळी ॲड.गणेश वरपे, वैभव मुरकुटे, सुरेंद्र कंधारे आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20251020 wa004028229283590677522994058



अल्पना वरपे यांनी सांगितले की, डावी- उजवी भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलेज परिसर, गादीया इस्टेट – शास्त्रीनगर तसेच सागर कॉलनी- डी पी रोड परिसरातील रहिवाशांना रोजच 3-6 तासापर्यंतच्या अघोषित लोड शेडिंगचा सामना करावा लागत आहे. या अघोषित लोड शेडिंगमुळे नागरिकांना पाणी प्रश्नापासून इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नियमीत वीज पुरवठा होत नसल्याने मेडिकल संदर्भातील समस्यांना ही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. घरात कोणी ऑक्सिजन चा रुग्ण असेल तर त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. वर्क फ्रॉम होम असलेल्यांच्या नोकरीवर देखील याचा परिणाम झालेला आहे.

Img 20251021 wa00215783582216279222785

ज्या पद्धतीने एखा‌द्या व्यक्तीने वीजबिल वेळेवर भरले नाही तर तत्परतेने त्याच्यावर कारवाई होते. परंतु दैनंदिन जीवनात वीज ही मूलभूत गरज झालेली असून देखील तेवढ्या तत्परतेने वीजे संबंधितल्या तक्रारींचे निवारण होताना दिसत नाही, तसेच  महावितरणच्या कोथरुडच्या कॉल सेंटर व संबंधित अधिकाऱ्यांकडून नागरिकांना अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप वरपे यांनी केला आहे.

Fb img 17609598297903329446613329696146

वरील भागातील ट्रान्सफॉर्मर, RMU युनिट्स, भूमिगत व ओवरहेड केबल्स, फिडर पिलर्स अश्या सारख्या वीज पुरवठ्याकरीता महत्वाच्या असणाऱ्या साधनांची दुरुस्ती व मेंटेनन्स वेळोवेळी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे, ही अतिशय गंभीर बाब असून महावितरण कर्मचाऱ्यांच्या अशा हलगर्जीपणा मुळेच नागरिकांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

वर उल्लेख केलेल्या भागातच ही अघोषित लोड शेडिंग होत असून इतर भागात मात्र सुरळीत वीज पुरवठा चालू असतो. त्यामुळे सदर अघोषित लोड शेंडीग हे आपल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे म्हणजे मानवनिर्मित आहे त्यामुळे सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरण कार्यालयात निषेधाचा पहिला टप्पा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा वरपे यांनी दिला आहे.

यावेळी महावितरण पुणे परिमंडलचे मुख्यअभियंता सुनील काकडे यांनी या भागातील विद्युत समस्येचे निराकरण लवकरच करण्यात येईल व तसा फरक या भागातील नागरिकांना जाणवेल असे आश्वासन निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.

Img 20251021 wa00122100789552137492834
Img 20251021 wa00077924620915763486560
Screenshot 20251021 131533 samsungnotes2275637561417477610
Img 20251021 wa00243288863336118069694
Img 20251021 wa00237664287915402761631
Img 20251018 wa0030609838676708167913
Screenshot 2025 1021 1300121953530042023732179
Img 20251021 wa00208970928523535608684
Img 20251021 wa00006333931711753439516
Fb img 17610271591433628409609411560328
Img 20251021 wa00167093042610924587921
Img 20251021 wa00093638709736402812696
Img 20251021 wa00111170140857498694582
Img 20251021 wa00104287532538496241556
Img 20251021 wa00064960866651564255172
Img 20251021 wa00034642673268297295312
Img 20251021 wa00054313159785922056687
Img 20251021 wa00043692228076462310685

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये