पुणेकरांची पीएमपीएमएल बस सुरु

पुणे : अनलॉक मध्ये जनजीवन पूर्ववत होत असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड करांसाठी आनंदाची बातमी आहे गुरुवारपासून पी एम पी एल ची बस सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
तब्बल पाच महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पीएमपीएल रस्त्यावर धावत आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे. पीएमपीएमएल च्या वतीने आजपासून २५ % बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्यावर दाखल झाल्या आहेत. यामध्ये दिवसभरात १९० बसेसच्या फेऱ्या सुरु आहेत.
मोहोळ म्हणाले, सर्वसामान्य पुणेकरांच्या सोयीसाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन पीएमपीएमएल ची सेवा सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनीही आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेऊन बसने प्रवास करावा.




