‘शिवजयंती’साठी पुणेकरांसाठी अनोखी भेट; ‘किल्ले शिवनेरी’साठी PMPML ची बससेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर (Shivneri fort) देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आता पीएमपीएमएल बससेवा सुरू होणार आहे. दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी भोसरी ते किल्ले शिवनेरी या मार्गावर पहिली बस धावणार आहे.

शिवजयंती निमित्ताने पुणेकरांना मिळालेली ही आगळी-वेगळी भेट मिळाल्याचे मानले जात आहे. आमदार अतुल बेनके यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना पत्र लिहून भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर अशी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी या मागणीसाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली होती. पीएमपीएमएल प्रशासनाने भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर या मार्गाचा सर्व्हे केला होता. त्यानंतर आता ही बसस्थानक सुरू होत आहे.