पुणे शहर

दगडूशेठ गणपती ला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

किरणोत्सव सोहळ्यात सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांचा गाभा-यात प्रवेश


पुणे : धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणा-या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर येतात.

 
दगडूशेठ गणपती मंदिरात शुक्रवारी सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवला. सकाळी ८ वाजून २५ मिनीटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी स्पर्श केला.

Img 20220211 wa00017071111553229498356

यासंबंधी माहिती देताना ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले, गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा दरवर्षी अनुभवायला मिळतो.

दगडूशेठ गणपती बाप्पांना शुक्रवारी सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश… असा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश करीत हा महाभिषेक केला.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये