राजकीयराष्ट्रीय

महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून बलात्कार होतात; भाजप आमदाराचे वक्तव्य

नवी दिल्ली : प्रियांका गांधींनी महिलांनी काय परिधान करावं, हा त्यांचा अधिकार आहे, असं विधान केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी कर्नाटकचे भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महिलांच्या पोशाखामुळे बलात्काराच्या घटना घडतात असा दावा त्यांनी केला. विधानामुळे वाद निर्माण होऊ शकतो, हे लक्षात येताच सारवासारव करत मी महिलांचा आदर करतो म्हणत दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये येणाऱ्या मुस्लीम मुली हिजाब घालत असल्यावरून मोठा वाद सध्या निर्माण झाला आहे. यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच कर्नाटकमधील भाजप आमदाराने हे वादग्रस्त विधान केले आहे. “महाविद्यालये किंवा शाळांमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी गणवेश किंवा त्यांचं शरीर पूर्णपणे झाकलं जाईल असे कपडे घालायला हवेत. महिला परिधान करत असलेले काही कपडे पुरुषांना उत्तेजित करतात, त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. हे योग्य नाही. कारण महिलांना आपल्या देशात आदर आहे, आपण महिलांना माता मानतो”, असं विधान रेणुकाचार्य यांनी केलं आहे.

“प्रियांका गांधी या एक महिला आहेत, काँग्रेस नेत्या आहेत. आम्ही महिलांच्या मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. मुंबई आणि केरळ उच्च न्यायालयांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश सक्तीला मान्यता दिली आहे.”, असं देखील ते म्हणाले. महिलांच्या कपड्यांबाबत एम. पी. रेणुकाचार्य यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना टीका केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये