पुण्यात जोडप्यास मारहाण करुन लूटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक..

पुणे :- पाषाण परिसरातील सुस रोड येथील टेकडीवर फिरायला गेलेल्या जोडप्यास मारहाण करुन लूटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे . त्यांनी जोडप्याच्या बॅंक खात्यातून फोन पेव्दारे 76 हजाराची रक्कम वर्ग करुन घेतली होती.
या सराईत गुन्हेगारांवर मराठवाड्यासह विविध जिल्हयात तब्बल 14 लूटमारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.गणेश ऊर्फ लहु रामभाऊ चव्हाण(धंदा मिस्तरी,रा.लोणीकंद,ता.हवेली, मुळ ता.जिंतुर जिल्हा परभणी ) आणि राजु मंजुनाथ जगताप ( धंदा-मिस्तरी ,रा. नसरापुर ता.हवेली, मुळ बिरुर, ता.कडोर, जिल्हा चिपमगळुर, कर्नाटक ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पाषाण टेकडीवरील संगणक अभियांता असलेल्या जोडप्याला मारहाण करुन लुटण्यात आले होते. पाषाण बाणेर टेकडी वरती जोडप्यांना व नागरिकांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच या परिसरामध्ये पाषाण टेकडीवर जाणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी देखील नागरिक करत आहेत.




