प्रधानमंत्री रोजगार योजनेतुन अनेक बेरोजगारानां नोकरी उपलब्ध; दुष्यंत मोहोळ यांच्या पुढाकारातून कोथरूड मध्ये उपक्रम

पुणे : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृवाखालील NDA सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाणुसार कौशल्य विकासावर भर देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोथरुड भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी पुढाकार घेत कोथरूड मध्ये पंतप्रधान रोजगार योजना हा उपक्रम राबविला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा आणि व्हिन्सीस आय टी सर्विसेस च्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री रोजगार योजने अंतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपा सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिक्षित बेरोजगारांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाव्यात या हेतूने कौशल्य विकासाचे अनेक अनेक कोर्स मोफत उपलब्ध करून दिले होते.
या प्रशिक्षणाचा अनेक बेरोजगार तरुणांनी लाभ घेतला होता हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी निर्माण झाल्या त्यातूनच आज 100 सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देश-विदेशातील नामांकित वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आज अशा नोकरी मिळालेल्या सर्व तरुणांचा सत्कार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी नगरसेविका नगरसेविका हर्षाली माथवड,कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, दुष्यंत मोहोळ, नवनाथ जाधव,अमित तोरडमल,अभिजीत राऊत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते









