पुणे शहरराजकीय

गर्दीत हरवली उमेदवारच आणि…

पुणे महापालिकेत महिला आरक्षण लागू झाले, त्यावर्षी अनेक गमतीदार प्रसंग घडले. काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीत बोलताना नवऱ्याचे नाव घ्यायला नऊवारी साडीतील एक उमेदवार इतक्या लाजल्या की, त्यावेळचे त्यांचे वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले छायाचित्र खूप गाजले.

महापालिका भवनात एका मजल्यावर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था होती. स्वाभाविकच महापालिकेत गर्दी झाली होती. महापालिकेची ती जुनी भव्य इमारत पाहून नवीन उमेदवार बुजून गेल्या होत्या.  जुन्या इमारतीतील अंतर्गत रचना इतकी गोंधळात टाकणारी आहे की, पाच-पाच वर्ष तिथे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही इमारतीतील मजले आणि दालनांचा उलगडा होत नाही.

त्या गोंधळात नव्यानेच अर्ज भरत असलेल्या एक उमेदवार बाई चुकल्या. अर्ज दाखल करायची वेळ आली आणि लक्षात आलं की उमेदवार बाईच दिसत नाहीत. मग, कार्यकर्त्यांची शोधाशोध सुरु झाली. बाई पूर्व भागाच्या एका पेठेतीलच उमेदवार होत्या. कार्यकर्त्यांच्या माहितीच्या होत्या. ते, त्यांना सगळीकडे शोधू लागले. शोधता-शोधता त्या महापालिकेच्या प्रवेशद्वारापाशी आढळल्या.

कार्यकर्ते धावतच तिथे गेले आणि म्हणाले, बाई इथे कुठे थांबल्या? त्या म्हणाल्या, मला इथे मजला, दालन हे काहीच सुधरेना, दारात येऊन थांबलेय, अजून पाच मिनिटे वाट पाहाणार होते आणि घरीच जाणार होते. त्यांचे उत्तर ऐकून कार्यकर्ते हबकले. त्यांनी बळे-बळे त्या बाईंना अर्ज दाखल करण्यासाठी नेले, अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, अर्ज न भरताच घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या बाई निवडून आल्या.

राजेंद्र पंढरपुरे
(जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक)

सिंहासन NEWS- एका क्षणात निर्णय अन् कोथरुडच्या कचरा डेपोचा प्रश्न निकाली.. https://www.sinhasannews.com/in-a-moment-the-decision-solved-the-question-of-the-garbage-depot-of-kothrud-9186/

सिंहासन NEWS– ‘पंजा’ चिन्हावर देशात पहिला विजय मिळविणारे प्रकाश ढेरे https://www.sinhasannews.com/prakash-dhere-who-won-the-first-victory-in-the-country-on-the-paw-symbol-8957/

सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/

सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/

सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/

सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/

सिंहासन NEWS– ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से https://www.sinhasannews.com/chakra-for-the-blessings-of-the-astrologer-maharaj-8683/

सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/

Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00038702747946855041624

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये