पुणे शहर

कोथरूड आमदार नाटय महोत्सवात प्रशांत दामले यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार

पुणे : विश्व विक्रमी 12500 नाटय प्रयोग करणारे मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामलेंचा पुणेकरांच्या वतीने पुण्याचे पालकमंत्री कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी आयोजित एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळाला.

यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा देखील महोत्सवाचे आयोजक अजित जगताप आणि सुजाता जगताप यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अजित जगताप आणि सुजाता अजित जगताप यांच्या वतीने आयोजित आमदार नाट्यमहोत्सव २०२२ मध्ये तिसऱ्या दिवशी प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रेमाचे प्रतिक असलेल्या 12500 बदामांचा हार घालीत पुणेकरांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशांत दामले यांचे अनोखे स्वागत

Fb img 1668686699870378047254845246628

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर रस्त्याच्या दुतर्फा अभिनेते प्रशांत दामले यांनी सादर केलेल्या नाटकातील प्रसंगांचे फोटो लावण्यात आले होते. सोबतीला सुख म्हणजे नक्की काय असतं, ती परी अस्मानीची अशा दामले यांच्या नाटकातील गाजलेल्या सुमधुर गाण्यांचा आवाज कानावर पडत होता.
नाट्य ग्रहात प्रवेश केल्यानंतर फुलांच्या वर्षावात दामले यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

Fb img 16686923827748388723104908770519

आमदार नाटय महोत्सवात पहिल्या दिवशी ‘ अलबत्या गलबत्या’ दुसऱ्या दिवशी हिच तर फॅमिलीची गंमत आणि अखेरच्या दिवशी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’  या नाटकांचा कोथरूड मधील नाटय रसिकांनी मनसोक्त आनंद लुटला.

आयोजक अजित जगताप म्हणाले, प्रशांत दामले या दिग्गज अभिनेत्यांचा सत्कार या महोत्सवात करता आला याचा विशेष आनंद आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाठीशी ठाम पणे उभे राहिल्यामुळेच हा महोत्सव यशस्वीपणे पूर्ण झाला.  कोथरूड मध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या नाटयगृहाच्या नावामध्ये बदल करावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावामध्ये आवश्यक बदल करून हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्याची मागणी मी पालकमंत्री चंद्रकांत दादांना करीत आहे. कोथरूडच्या  नाटय रसिकांसाठी आमदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. तीनही दिवस नाटकांना रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये