महाळुंगे सुस शिवसेनेचा बालेकिल्ला- संजय जाधव

पुणे : महाळुंगे सुस हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या परिसरातून शिवसेनेचा नगरसेवक पालिकेवर जाणार यासाठी परभणीकर देखील शिवसेनेसाठी प्रयत्न करतील असे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.
बाणेर सुस महाळुंगे प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेनेच्या शिव संपर्क अभियान निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, सहकार सेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब भांडे, उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, डॉ. दिलीप मुरकुटे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, महिला आघाडी उपशहर समन्वयक ज्योती चांदेरे, माजी सरपंच मयुर भांडे, नितीन चांदेरे, किसन सुतार, ॲड. लीना मुरकुटे, ऋतिक धनकुडे आदी उपस्थित होते.
बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे परिसरामध्ये मराठवाडा व विदर्भातील अनेक नागरिक कामानिमित्त राहण्यास आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मानणारा वर्ग या परिसरात असल्याने खासदार संजय जाधव यांनी या परिसरामध्ये शिवसेनेचा नगरसेवक झाला पाहिजे यासाठी बांधणी करण्याचे आवाहन यावेळी केले.बाणेर सुस महाळुंगे प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना दोन्ही जागा निवडून आणणार असा विश्वास यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला तसेच परभणी मधील नागरिकांनी यावेळी खासदार संजय जाधव यांचा परभणी करांच्या वतीने सत्कार केला.

बाळासाहेब भांडे म्हणाले, सुस महाळुंगे या दोनही गावांचा सरपंच शिवसेनेचा जन मतातून निवडून आलेला होता. प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी पक्षाकडून हा विकास आघाडीचा धर्म पाळला जातो नाही. यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना आघाडी न करता लढण्याची परवानगी द्यावी.
डॉ. दिलीप मुरकुटे म्हणाले, स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेना खिशात हात असल्याची भाषा केली जात आहे. शिवसेना नेते त्यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवून देईल. प्रभाग क्रमांक 13 हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला भाग झाला आहे.
या कार्यक्रमाला बाणेर सुस महाळुंगे विधाते वस्ती परिसरातील नागरिक उपस्थित होते.



