पुणे शहर

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्यांवर होणार या मोठ्या बक्षीसांचा वर्षाव

पुणे : ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अभूतपूर्व ठरविण्यासाठी आपल्या संस्कृती प्रतिष्ठानची जय्यत तयारी सुरु आहे. सर्व सहभागी स्पर्धकांच्या सुलभतेसाठी उपयुक्त वस्तूंची पूर्तता आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार असून विजेत्या कुस्तीगीरांना महाराष्ट्र केसरीच्या मुख्य पारितोषिका बरोबरच बुलेट ते हिरो होंडासारख्या आकर्षक दुचाकीसह चारचाकीदेखील बक्षीस स्वरूपात दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी विजेत्यांना चारचाकी वाहन बक्षीसरुपी दिले जाणार आहे. अशी माहिती माजी महापौर आणि कुस्ती स्पर्धेचे संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र केसरीच्या विजेत्यास पाच लाखांच रोख बक्षीस बुलढाणा अर्बक बँकेचे शिरीष देशपांडे यांनी तर उपविजेत्यास अडीच लाखांचे पारितोषिक उद्योजक चंद्रकांतअण्णा भरेकर यांनी जाहीर केले आहे. सुभाष नाणेकर, बापू दगडे, राहुल इंगवले, दिनेश माथवड आणि व्यंकोजी खोपडे यांच्यातर्फे प्रत्येकी एक बुलेट पारितोषिक दिली जाणार आहे.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

दिनांक १० ते १४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत गादी आणि माती विभागातील ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो व ७४ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या कुस्तीगीरास दुचाकी होंडा तर ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो वजन गटातील सुवर्णपदक विजेत्यांना बुलेट गाडी बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. यासह प्रत्येक वजन गटातील रौप्यपदक आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या कुस्तीगीरांना देखील रोख बक्षीस दिले जाईल. रोख बक्षीस प्रथमच देण्यात येत आहे. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला उपयोगी साहित्य दिले जाणार आहे, यात ट्रॅक सुट, कॉस्च्यूम, टी शर्ट, कॅप अशा वस्तुंचा समावेश आहे.विशेष म्हणजे बक्षीसांचा वर्षाव अजूनही सुरु असून अनेक मान्यवर त्यासाठी संपर्क सुध्दा करीत आहेत. अशी माहिती मोहोळ यांनी दिली आहे.
    

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये