सह्याद्री कुणबी संघ व श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन
कोथरुड : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री कुणबी संघ व श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने कोथरूड हॉस्पिटलमध्ये विनामूल्य आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटपांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ ३८७ नागरिकांनी घेतला.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित केलेल्या या शिबिरात हाडांच्या आजारांवर विशेष उपचार व निदान करण्यात आले. हाडांच्या सर्व तपासण्यांसह मधुमेह, रक्तदाब, ईसीजी यांसह विविध आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. कोथरूड हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तुषार दाते, डॉ. निखिल ओझा, डॉ. राजेंद्र मिटकर, डॉ. राजेंद्र गुंडावार, डॉ. दिव्याणी दाभाडे आदींनी या तपासण्या करून नागरिकांना योग्य उपचार व मार्गदर्शन केले.
या शिबिराला मनसेचे किशोर शिंदे, संजय काळे, गणेश शिंदे, श्रीकांत अमराळे, माजी नगरसेविका अल्पना वरपे, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, पुनीत जोशी, राजाभाऊ गोरडे, उमेश भेलके, गणपतजी वाशिवले, आदींसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
उपक्रम यशस्विरित्या होण्यासाठी निखिल वाशिवले, विराज डाकवे, भावेश व्यास, प्रतिक कंधारे, सतिश डाकवे, अविनाश शिंदे, किरण म्हसवडे. सुशील सरकाटे, अंगद होंडे, यश दंडगे, ओंकार मारणे, प्रविण रामाने, उमेश बुरटे, जगदीश बडंबे, सागर धुलप, सूरज नलवडे यांनी अथक परिश्रम केले. तसेच आरती डाकवे, वैष्णवी भोज, अंकिता शिगवण, वर्षा घडशी, ज्योती घडशी आदी महिला कार्यकर्त्या सहभागी होत्या.










