कार्यकर्त्यांना मारहाणीचा भाजपा युवा मोर्चाकडून निषेध

पुणे: धुळे येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडी समोर निदर्शने करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा व मुळशी तालुकाच्या वतीने तहसीलदार पौड यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले
या प्रसंगी युवामोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक किरण दगडे पाटील , युवामोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस जीवन साखरे, मुळशी तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, संपर्क प्रमूख बाळासाहेब कुरपे, सरचिटणीस श्याम धुमाळ , उपाध्यक्ष मारुती कुरपे, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली सणस, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनुप मारणे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस योगेश कुमावत, सरचिटणीस प्रवीण भरम, संघटन सरचिटणीस अमोल धनवे, प्रतीक साखरे ,अरुणा वीर ,राम बरडे, आदी उपस्थित होते.
मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत राजीनामा द्या, आघाडी सरकारचा जाहीर निषेध असे फलक हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.



