‘मोदीजी धन्यवाद’ उपक्रमाची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून कर्वेनगरमध्ये सुरूवात

पुणे : प्रधानमंत्री कल्याण अन्न योजने अंतर्गत ८० कोटी नागरीकांना २.५ लाख कोटी रुपयांचे मोफत धान्य ऊपलब्ध करुन दिल्या बद्ल भाजपाच्या “ मोदीजी …..धन्यवाद “ या ऊपक्रमा अंतर्गत प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कर्वेनगर येथील आमच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये नागरिकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.
भाजपा कोथरूड मतदारसंघ आणि भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहर सरचिटणीस विनोद मोहिते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी नगरसेवक राजेश बराटे , सुशील मेंगडे , वृषाली चौधरी , कोथरुड सरचिटणीस विठ्ल बराटे , प्रभाग अध्यक्ष हेमंत बोरकर , अनंता शिंदे व कार्यकर्ते ऊपस्थित होते.
पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकट काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कल्याणकारी योजना राबविली. या योजनेमुळे गरीबांना मोफत धान्य उपलब्ध झाले. त्यामूळे मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.







