पुणे शहर
पुणेकरांच्या मिळकत कराच्या तीनपट दंडाची रक्कम होणार रद्द

नागपूर : पुणे शहरातील मिळकतकर आकारणीच्या दंडाची तीन पट रक्कम रद्द करावी अशी मागणी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी हिवाळी अधिवेशनात केली. त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांच्या मिळकत कराच्या दंडाची तिप्पट कर आकारणी रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले.




