महाराष्ट्र

भुजबळांच्या फोटोशी छेडछाड करणाऱ्या भातखळकरांवर कारवाई करण्याची जयंत पाटलांची मागणी

नागपूर : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर भुजबळांच्या फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

Image editor output image821631933 1671620844380

“सभागृहातील सदस्य दुसऱ्या ज्येष्ठ सदस्यांच्या फोटोशी छेडछाड करून सोशल मीडियावर शेअर करत असतील, तर ते योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली. तसेच गृहमंत्र्यांनी भातखळकरांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राजकीय नेत्यांनी संहिता पाळाव्यात

दरम्यान, याबाबत बोलताना राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये. त्यांनी सोशल मीडियावरील संहिता पाळाव्यात, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये