कोथरुड

कर्वेनगर, वारजे परिसरात २ हजार कुटुंबांना कोव्हीड हेल्थ किटचे वाटप

कोथरुड : कोरोना कमी झाला असे दिसत असले तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. सरत्या वर्षाला निरोप देताना व नव्या वर्षात पदार्पण करत असताना प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातुन  नगरसेविका लक्ष्मी देवराम दुधाने व राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्या वतीने कर्वेनगर वारजे परिसरतील दोन हजार कुटुंबाना आरोग्यविषयक कोव्हीड हेल्थ किट covid- health kit देण्यात येणार असून त्याच्या वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे.

या देण्यात येणाऱ्या किट मध्ये प्रत्येकी आठ मास्क, २०० एम एल सॅनिटायजर, २०० एम एल हॅन्डवॅाश, एक कापडी  पिशवी तसेच लक्ष्मी दुधाने, स्वप्निल दुधाने व त्यांच्या सर्व सहकार्यांनी गेल्या नऊ महिन्यापासुन कोविड संदर्भात केलेल्या मदत व कामांचा कार्यअहवाल देण्यात येत आहे.

Img 20201226 wa0178

स्वप्नील दुधाने म्हणाले की, कोरोना पूर्ण संपलेला नाही. परंतु प्रशासनाच्या खबरदारी मुळे व नागरिक घेत असलेल्या काळजी मुळे कोरोना आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे. नुकताच ब्रिटन मध्ये सापडलेल्या कोरोना च्या नव्या विषाणूंमुळे खळबळ उडाली आहे. आपल्याकडेही प्रशासन खबरदारी घेत आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले तर आपण केल्यास या संकटावर कायमस्वरुपी आपण मात करु शकणार आहोत.

Img 20201213 wa0074
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये