पुणे शहर

मंडई मेट्रो स्टेशनला आग ; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण..

पुणे : पुणे मेट्रोच्या मंडई मेट्रो स्टेशनला आग लागण्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टाळला. रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

Pune metro मध्यराञी बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे बेसमेंटमध्ये फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीने 5 वाहने रवाना करीत आग पाचच मिनिटात आटोक्यात आणली गेली.

जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन आग विझवली. जखमी कोणी नसून आग वेल्डिंगचे काम सुरु असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Img 20241020 wa00015243193050905147069
Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये