महाराष्ट्र
पुण्यात लहान मुलांवरील सिरमच्या कोरोना लसीच्या चाचणीला सूरवात ; जानेवारीत लसीकरण ?

पुणे : pune city कोरोनावरील लहान मुलांची लस कधी येणार यावर आतापर्यंत चर्चा सुरू होती पण आता ही प्रतीक्षा संपण्याच्या टप्प्यात आली आहे. सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीच्या लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायलला सुरवात झाली आहे. भारतात ९ ठिकाणी १ हजार मुलांवर याची चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यात त्याची आज सुरुवात झाली आहे.
पुण्यातील भारती हॉस्पिटल मध्ये २ ते १८ वयोगटातील १०० मुलांवर लसीची क्लिनिकल चाचणी केली जाणार आहे.
चाचणी पूर्ण झाल्यानंतर लसीचे परिणाम सकारात्मक आले तर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लहान मुलांच्या लसीकरणास सुरावात होण्याची शक्यता भारती हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ संजय ललवाणी यांनी व्यक्त केली आहे.




