पुणे शहर

पुणे महापालिका निवडणूक : कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणे आणि वारजेमध्ये होणार तुल्यबळ लढती

प्रभाग क्रमांक 30,31,32,33,34,35,36,16 आरक्षण सोडत जाहीर

पुणे : अनेकांचे राजकीय भवितव्य घडवणाऱ्या पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठीची महिला आरक्षण सोडत आज जाहीर झाली. या सोडतीत प्रभागांमध्ये दोन महिला एक परूष किंवा दोन पुरुष एक महिला असे महिला- पुरुष आरक्षण पडले. या आरक्षणानंतर अनेक प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे. ज्या ठिकाणी दोन महिला एक पुरुष असे आरक्षण पडले आहे अशा ठिकाणी इच्छुकांसमोर मोठा पेच निर्माण होणार असून अशा प्रभागांमध्ये पुरुष गटात दोन मात्तबर उमेदवारांना एकमेकांसमोर लढावे लागणार आहे तर एकाच पक्षातील प्रमुख पुरुष गटात असणाऱ्या दोन दावेदार उमेदवारांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी काटशहाचे राजकारण रंगणार आहे. तुल्यबळ लढती पाहायला मिळणार आहेत.

प्रभाग क्रमांक ३० जयभवानीनगर केळेवाडी या प्रभागात अ – सर्वसाधारण महिला,  ब – सर्वसाधारण,  क – सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. म्हणजे या प्रभागात पडलेल्या आरक्षणानुसार एक महिला व दोन पुरुष असा पॅनल होणार आहे. नव्याने झालेल्या या प्रभागात मागील पंचवार्षिक मध्ये दीपक मानकर, चंदू कदम, छाया मारणे, व वैशाली मराठे हे नगरसेवक निवडून आले होते. आता नव्याने झालेल्या प्रभाग रचनेत वस्ती विभाग जास्त व सोसायटीचा काही भाग अशी रचना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व या प्रभागात असणार आहे.  या प्रभागात केळेवाडी, हनुमाननगर, जयाभवनीनगर, सुतारदरा, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, एमआयटी रोड असा भाग असणार आहे.

चर्चेतील इच्छुकांची नावे
राष्ट्रवादी काँग्रेस -माजी उपमहापौर दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर, गणेश माथवड, दिपाली ढोक, तृप्ती शिंदे, पूजा शिर्के,
काँग्रेस -चंदू कदम, वैशाली मराठे,
भाजप – अजय मारणे, छाया मारणे, अभिजित राऊत, अनिता तलाठी, संदीप बुटाला
शिवसेना – नितीन शिंदे, किशोर सोनार, सविता मते, अनिल घोलप, नितीन पवार, जयदीप पडवळ
मनसे – सागर भगत, गणेश शिंदे, किरण उभे, सुरेखा होले,
शाम बोराडे, अरुण हुलावळे, बाळासाहेब शिंदे, साधू धुमाळ

प्रभाग ३१ कोथरूड गावठाण शिवतीर्थनगर या प्रभागात
अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण, क – सर्वसाधारण असे आरक्षण आहे. म्हणजे दोन पुरुष व एक महिला असा या प्रभागात पॅनल असणार आहे. शिवसेना विरुद्ध भाजप अशी सरळ लढत या प्रभागात पहिला मिळणार आहे. गुजरात कॉलनी, शिवतीर्थनगर, परमहंसनगर, लोकमान्य वसाहत, आझादनगर असा या प्रभागात आहे

चर्चेतील इच्छुक
शिवसेना –  पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, अंकुश तिडके, उमेश भेलके,
भाजप – हर्षाली माथवड, वासंती जाधव, श्रद्धा प्रभुणे, अजित जगताप, जगन्नाथ कुलकर्णी, दुष्यंत मोहोळ, अमित तोरडमल
काँग्रेस – राजू मगर, राज जाधव
मनसे – किशोर शिंदे, सुधीर धावडे, सुप्रिया काळे, प्रशांत पायगुडे, अमोल शिंदे, सुशांत भुजबळ

Img 20220518 wa00135092505186750304354 2

प्रभाग क्रमांक ३२ भुसारी कॉलनी, बावधन खुर्द
अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण पुरुष असे या प्रभागात आरक्षण आहे. दोन महिला व एक पुरुष असा पॅनल या प्रभागात असणार आहे. डावी व उजवी भुसारी कॉलनी, महात्मा सोसायटीचा काही भाग, बावधनचा काही भाग, शास्त्रीनगर, सागर कॉलनी असा भाग या प्रभागात असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस – शंकर केमसे, जयश्री मारणे, सचिन डाकले, सीताराम तोंडे पाटील,
भाजप – किरण दगडे पाटील, दिलीप वेडेपाटील, अल्पना वरपे, राजाभाऊ जोरी, राजेश कुलकर्णी, सचिन पवार
मनसे : स्वाती वेडेपाटील, प्रशांत कनोजिया, विराज डाकवे
रमेश उभे, नितीन गायकवाड, पुष्पा कनोजिया, सुभाष आमले

माजी नगरसेवक राजा गोरडे व अंजली गोरडे ही या प्रभागातून इच्छुक आहेत.

प्रभाग क्रमांक ३३ आयडीएल कॉलनी – महात्मा सोसायटी
अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण, क- सर्वसाधारण असे आरक्षण पडले असे. एक महिला दोन पुरुष असा या प्रभागात पॅनल असणार आहे. महात्मा सोसायटी चा काही भाग डहाणूकर कॉलनी हॅप्पी कॉलनी गोसावी वस्ती गिरजा शंकर परिसर मयूर कॉलनी आयडियल कॉलनी असा हा प्रभाग असणार आहे.

चर्चेतील इच्छुक
भाजप – माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रशांत हरसूले, कांचन कुंबरे, शिरीष भुजबळ, सचिन फोलाने,
मनसे – हेमंत संभूस, रमेश परदेशी, शशांक अमराळे, हर्षद खाडे, महेश पाठक, शिवसेना – बापू चव्हाण

नितीन ननावरे हे देखील या प्रभागातून इच्छूक उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक ३४ वारजे- कोंढवे धावडे
अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण, क- सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. एक महिला दोन पुरुष असा या प्रभागात पॅनल असणार आहे. राजयोग सोसायटी, वारजे हायवे परीसर, माळवाडी, शिवणे उत्तमनगरची उजवी बाजू

चर्चेतील इच्छूक
राष्ट्रवादी काँग्रेस – बाबा धुमाळ, सचिन दोडके, दीपाली धुमाळ, सुरेश गुजर, त्रिंबक मोकाशी

भाजप – सचिन दांगट,किरण बारटक्के, सुभाष नानेकर, मनीषा दांगट, वासुदेव भोसले
भारत भूषण बराटे यांचे नाव देखील चर्चेत आहे.

प्रभाग क्रमांक 35 – रामनगर, उत्तमनगर, शिवणे
अ- सर्वसाधारण महिला, ब- – सर्वसाधारण महिला, क- सर्व साधारण असे आरक्षण पडले आहे. दोन महिला, एक पुरुष असा या प्रभागात पॅनल असणार आहे.
रामनगर, वारजे गावठाण, दांगट पाटिल इस्टेट, शिवणे, उत्तमनगर असा भाग या प्रभागात आहे

चर्चेतील इच्छूक
राष्ट्रवादी काँग्रेस- दिलिप बराटे, सायली वांजळे, अनिता इंगळे, अतुल दांगट
भाजप- सचिन दांगट, सुभाष नानेकर,
काँग्रेस- सचिन बराटे, दत्ता झंजे

प्रभाग क्रमांक 36  कर्वेनगर
अ- सर्व साधारण महिला, ब – सर्व साधारण महिला, क- सर्व साधारण असे आरक्षण पडले आहे.दोन महिला, एक पुरुष असा या प्रभागात पॅनल असणार आहे.
कर्वेनगर गावठाण, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10, हिंगणे होम कॉलनी, शाहू कॉलनी, दुधाणे नगर, मावळे आळी, गोसावी वस्ती असा भाग या प्रभागात आहे

चर्चेतील इच्छूक
भाजप – राजेश बराटे, सुशील मेंगडे, विनोद मोहिते, वृषाली चौधरी, महेश पवळे, विशाल रामदासी, गणेश पासलकर, शिल्पा सचिन फोलाणे
राष्ट्रवादी काँग्रेस- स्वप्निल दुधाणे, प्रविण दुधाणे, तेजल मयुर दुधाणे, निता प्रमोद शिंदे, संतोष बराटे, नंदिनी पानेकर, संगीता बराटे,विष्णू सलगर
काँग्रेस – विजय खळदकर,
मनसे – शैलेश जोशी, संजय नांगरे, आनंद पाटील, अशोक कदम, सचिन विप्र, संतोष वाघमारे, सुरेखा मकवान शिवसेना – अजय भुवड, सचिन थोरात, दिनेश बराटे, नंदू घाटे, जगदीश दिघे

अवंती चेतन भालेकर हे देखील या प्रभागातून इच्छूक उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक 16 फर्ग्युसन कॉलेज- एरंडवणे
अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण, क- सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. एक महिला दोन पुरुष असा या प्रभागात पॅनल असणार आहे.
नवसह्याद्री सोसायटी, गणेशनगर, खिलारेवाडी, प्रभात रस्ता, मेगा सिटी, पुलाची वाडी, बालगंधर्व रंगमंदिर असा भाग या परिसरात आहे.

चर्चेतील इच्छूक
भाजप –  मंजुश्री खर्डेकर,दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्रबुद्धे, अपूर्व खाडे, निलिमा खाडे, जोत्शना एकबोटे, मिताली सावळेकर, अमोल डांगे, रमा डांगे, रामदास गावडे, शिवाजी शेळके, अनुराधा एडके, गायत्री भागवत
मनसे – राम बोरकर,मंदार बलकवडे,अनिल राणे,दत्ता पायगुडे,गणेश शेडगे,उदय गडकरी
राष्ट्रवादी काँग्रेस – प्रा. मुक्ता थरकुडे,  सुकेश पासलकर, अर्चना चंदनशिवे, महेश हांडे, वेणु शिंदे
शिवसेना- गजानन थरकुडे, राजेश पळसकर, अनिल माझिरे, शिरीष आपटे
काँग्रेस – शिवा मंत्री, संदिप मोकाटे

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये