पुणे शहर

सदाशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने सदाशिव पेठेत तरुणीवर दिवसाढवळ्या रस्त्यावर कोयत्याने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय. 21) असे आरोपीचे नाव आहे.

Screenshot 2023 0630 1019401717363406982221625

प्रेमसंबंध संपवल्याचा रागातून त्या आरोपीने 27 जूनला सकाळी दहाच्या सुमारास पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीचा पाठलाग करुन तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. आरोपी शंतनूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे.

या तरुणीचा जीव लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी वाचवला. त्यामुळे ही तरुणी थोडक्यासाठी बचावली. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी जाधव याला एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682
Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये