पुणे शहर

पुणेकरांना बसणार मेट्रो कराचा भुर्दंड…

पुणे : पुण्यात नुकताच मेट्रो प्रकल्पातील वनाज ते गरवारे महाविद्यालय हा टप्पा सुरु झाला आहे. शहरात मेट्रो पूर्णक्षमतेने तयार होण्यास अद्याप वेळ आहे. मात्र तरीही येत्या 1 एप्रिलपासून पुणेकरांना एक टक्का मेट्रो अधिभारचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठी येत्या 1 एप्रिलपासून मालमत्ता खरेदी-विक्री करताना एक टक्का मेट्रो कर द्यावा लागेल. त्यासंदर्भातील स्वतंत्र आदेश गुरुवारी नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने काढले. ज्या शहरात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे, तेथे राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अंमलबजावणीस प्रारंभ झाला. परंतु 2020 मध्ये राज्य सरकारने या अधिभार वसुलीस 31 मार्च 2022 पर्यंत स्थगिती दिली होती.

Fb img 1647413731457

घराच्या किंमती वाढणार
मेट्रो सेसच्या स्थगितीचा कालावधी संपुष्टात येताच एक एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार लागू होईल . याबरोबरच 1 एप्रिलपासून नवीन व वाढीव रेडीरेकनर दरदेखील लागू होणार असल्याने घराच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनाही बसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये