कोविड रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी : अविनाश बलकवडे

पुणे : कोविडच्या महामारीमध्ये रुग्णांना बेड मीळवण्यापासून ते बिलापर्यंत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यात गरीब नागरिकांचे प्रंचड हाल होत आहेत. त्यामुळे गरीब व गरजूंसाठी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची योग्यप्रकारे अंमल बजावणी करून गरीब आणि गरजू रुग्णांना बिलात सवलत देऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि युवासेनेच्या वतीने अविनाश बलकवडे यांनी केली आहे. Effective implementation of Mahatma Jyotiba Phule Janaarogya Yojana for poor Kovid patients.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा शल्य चिकित्सक अशोक नांदापूरकर व महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजनेचे पुणे जिल्हा समनव्यक सागर पाटील आणि प्रीती लोखंडे यांच्याशी चर्चा करून योजनेची अंमलबजावणीतील अनिमियतता व नागरिकांच्या व्यथा मांडल्या. यावेळी शिष्टमंडळामध्ये युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा सहाय्यक अविनाश बलकवडे, कोथरूड विधानसभा संघटक उमेश भेलके, जयदीप पडवळ, अजय भुवड, उपतालुका प्रमुख गणेश भोईने, राम गवारे, गणेश काकडे आदी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळाकडून योजना राबवत असताना येणाऱ्या खालील अडचणी निदर्शनास आणून देण्यात आल्या.
१. निकषात बसत असलेल्या अनेक कोविड रुग्णांना या योजनेतून मोफत उपचार दिले जातात पण या विषयाची माहिती आणि त्याच्या कागदपत्रांची पूर्तता रुग्णांच्या नातेवाईकांकडून करून घेण्यासाठी आरोग्यमित्रांची यंत्रणा तत्पर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
२.सदर योजनेनुसार प्रत्येक हॉस्पिटल्स मध्ये असलेले आपले आरोग्य मित्र दर्शनी भागात आवश्यक त्या सर्व माहिती पत्रासहित बसणे आवश्यक असुन त्याठिकाणी सदर योजनेत होणाऱ्या उपचारा संदर्भातील माहिती फलक,त्यांच्या प्रक्रिये विषयी तसेच आरोग्य मित्रांचे नाव आणि संपर्क नंबर, तक्रार अधिकारी नाव आणि नंबर याची माहिती आणि फलक असणे आवश्यक आहे.
३. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असलेल्या 25% आरक्षित खाटांची हॉस्पिटल निहाय्य माहिती सबंधित रुग्णालयात उपलब्ध होणे आवश्यक असुन त्याप्रमाणात सदर योजनेचा लाभ रुग्णांना मिळतो का नाही हे तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी “ऑन-टाईम डॅश बोर्ड “तसेच रोजचा
खाटाच्या सख्येच्या प्रमाणातील रुग्णांचा “ऑक्युपेन्सी रिपोर्ट ” तपासणे आवश्यक आहे.
४.अनेक हॉस्पिटलच्या बाबतीत सदर योजनेचा लाभ रुग्णांना करून देण्या संदर्भात टाळाटाळ करून बेड उपलब्ध नसल्याची सबब दिली जाते आणि सदर गरजु रुग्णांची अडवणुक करुन त्यांना खाजगीत अॅडमीशन घेण्यास भाग पाडले जाते. अनेकवेळा या रुग्णांनी खाजगी पैसे भरून देखील या योजनेत देखील दाखवुन शासनाकडुन पैसे उकळले जातात त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही आपणाकडुन होणे आवश्यक आहे. ५.सदरच्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना होण्या संदर्भात या विषयी अधिकाअधिक जनजागृती होणे आवश्यक आहे.
या सर्व बाबींची दखल घेऊन यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन अशोक नांदापूरकर यांनी दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
अविनाश बलकवडे यांनी सांगितले की, सामान्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मोफत सुरू असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनमध्ये फार मोठया प्रमाणात अनियमितता आणि अनोगोंदी आहे. यामुळे सर्व सामान्यांच्या हितासाठी असलेल्या या योजनेच्या लाभापासुन त्यांनाच मोठया प्रमाणात वंचित ठेवले जात आहे. या योजनेमध्ये 996 आजारावर उपचार दिलेले असुन पुणे जिल्हयातील 80 हॉस्पिटलमध्ये ही योजना सध्या लागु आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीबाबत योग्य कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
उमेश भेलके म्हणाले, शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजूंना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने योग्य यंत्रणा लावून त्यावर नियंत्रण ठेवले तर नक्कीच या योजनेचा लाभ गरजूंना मिळेल.



