पुणे शहर

पुण्यासाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर आठ दिवसांनी पुन्हा पुणे दौरा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा शेवटचा दिवस असला तरी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला आहे. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.

सध्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे 30 जुलैपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान राज ठाकरे यांचा पुणे दौरा असणार आहे. राज ठाकरे यांनी यादरम्यान पुण्यातील विकास कामाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांना घरी येण्याचे निमंत्रणही दिले आहे.

Img 20210721 wa0051

त्याचबरोबर मनसे शहरात राजदूतांची नेमणूकही करणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे.

Img 20210721 wa0162
Img 20210721 wa0013

दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा सुरु आहे. दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.

Img 20210721 wa0158

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये