दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटाबरोबर भाजपवर हल्ला बोल

मुंबई : मी वचन देतो तुम्ही साथ आणि सोबत द्या पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवतो असे वचन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या दसरा मेळाव्यात जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला देतानाच एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख व्हायची लायकी आहे का अशा शब्दात फटकारले.
आजचा रावण खोकासुर आणि धोकासुर दसरा मेळाव्यात बंडखोरांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले आजचा रावण पन्नास खोक्यांचा आहे, आणि तो खोकासुर धोकासूर आहे. परिस्थिती बदलते तसे रावणाचे रूपे ही बदलतात अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.
आमच्या मेळाव्याची गर्दी तासाच्या बोलीवर आणली नाही
निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेचा काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला मात्र आजचे मेळाव्याला जमलेली गर्दी पाहून गद्दारांच कसं होणार असा प्रश्न त्यांना पडला असेल. आमच्या मेळाव्याची गर्दी भाड्याने आणलेले नाही, तासाची बोली लावून आणलेली नाही. यापैकी कोणालाही जाऊन विचारा तुम्ही येथे कशासाठी आलात, ते कशासाठी आले ते त्यांना माहिती आहे. हे सर्व लोक शिवसेनाप्रमुखांनी जोडलेली एकनिष्ठ लोक आहेत. अस म्हणत ठाकरे यांनी शिंदे यांच्या मेळाव्याला कशी गर्दी गोळा केली यावर भाष्य केलं.
गाईवर बोलता पण महागाईवर बोलत नाही
तुम्ही गाईवर बोलता पण महागाईवर बोलत नाही. कोणी महागाईवर बोलल्यानंतर मात्र तुमचे मंत्री जय श्रीराम म्हणतात असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला या मेळाव्यात लगावला
शिवसेनाप्रमुख पक्षप्रमुख व्हायला लायकी लागते
इतरांना बाजूला सारून तिकीट दिल आमदार केलं, मंत्री केलं, आता मुख्यमंत्री झालात तरी पण किती हाव असावी शिवसेनाप्रमुख पक्षप्रमुख व्हायचंय यांना पण ते व्हायला त्याला लायकी लागते. एक तर स्वतःच्या वडिलांचं नाव लावून मत मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद आहे तुमची असा शब्दात ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावल.

असला तुमचा कायदा आम्ही नाही पाळत
पुढे ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना चांगला कायदा कळतो. मी टोमणा नाही मारत तुमच मी चांगलं व सत्य बोलतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जाताना म्हणाले पुन्हा येईल पुन्हा येईल. पुन्हा आले दीड दिवसासाठी दीड दिवसात विसर्जन झाले. पुन्हा आले पण छातीवर दगड ठेवून उपमुख्यमंत्री झाले. आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून बोलायला सांगत आहेत कायदा सर्वांना कळतो. आम्ही कायदा पाळायचा तुम्ही डुकर पाळायची. गणपतीच्या मिरवणुकीत गोळ्या झाडतात. हा आहे का तुमचा कायदा, असा कायदा तुमचा असेल तर आम्हाला तो नको आणि असा तुमचा कायदा नाही मानत. आज आहे मी शिंदे यांना आवाहन देतो आपण एका व्यासपीठावर येऊन जनतेशी संवाद साधू फक्त भाजपच्या स्क्रिप्ट शिवाय बोलून दाखवा.



देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल
आज देशात हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल चालली आहे का काय असा प्रश्न पडतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देशात फक्त भाजप हा एकच पक्ष राहील असा भाष्य करतात यावरून तुम्ही समजून जा की आपण कुठल्या दिशेने चाललो आहे. देशाचा स्वातंत्र्य आबाधित राखण्यासाठी देशप्रेमींनी एकत्र येण्याची गरज आज निर्माण झाले आहे.



